तुम्ही सगळ्यांनी धूम चित्रपट पाहिला असेलच. नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिल्मी स्टाईल ने बँकेवर टाकण्यात आलेल्या ह्या दरोड्यमुळे नवी मुंबई पोलीस हि चक्रावून गेले आहेत. जुई नगर सेक्टर 11 मध्ये बँक ऑफ बडोदा वर दरोडा पडल्याचं आज सकाळी उघडकीस आले. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी जेव्हा बँक उघडण्यात आली तेव्हा हे प्रकार उघडकीस आला. बँकेच्या बाजूला असलेल्या दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजोरी फोडून सारा ऐवज चोरून नेला. चोरांनी नेमकी किती रक्कम चोरली ह्याची माहिती अजून मिळालेली नाही. शेजारच्या दुकानाच्या मालकाची आणि नोकरांची पोलीस कसून चौकशी करत आहेत
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews